top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
मराठा आरक्षण: पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला
नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची 25 जानेवारी रोजी होणारी सुनावणी आजच सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे घेण्यात आली. आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नसून पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला होणार आहे.अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडली.
bottom of page