top of page

.... अन् दुसरं कुणीतरी येईल: कंगना

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवरही शरसंधान केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना रणौतनं आज प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना रणौतनं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे फक्त जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधीही कुणीतही होतं. लवकरच हे जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखं का वागत आहेत?,” असं कंगनानं म्हटलं आहे.

bottom of page