top of page

किराणा दुकानं आता चार तासचं सुरू राहणार!

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कडक करत १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. निर्बंध लागू असतानाही काही नागरिक किराणा खरेदीच्या नावावर दिवसभर घराबाहेर फिरत असल्याने, आता किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

bottom of page