top of page

मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

मुंबई: न्यायालयाच्या आदेशानुसार अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी कंगना आणि रंगोली यापूर्वी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्या दोघी चौकशीसाठी हजार न राहिल्याने मुंबई पोलिसांनी पुन्हां एकदा समन्स जारी केले आहे. कंगनाकडून अद्याप या समन्सला उत्तर देण्यात आलेले नाही.

bottom of page