top of page

हळदीच्या रंगात रंगली काजल

मॉडेलिंगपासून सुरुवात करून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडणारी काजल अगरवाल विवाहबंधनात अडकणार आहे.गौतम किचलूशी काजल लग्न होणार असून मेहंदी व हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीच्या रंगात काजल रंगली असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल आणि गौतमचा विवाहसोहळा पार पडणार आहे. गौतम आणि काजल हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचं म्हटलं जातं. गौतम इंटेरिअर डिझायनर आहे. 

bottom of page