top of page

नितीश कुमार यांना ‘राजद’कडून ऑफर

मुख्यमंत्री नितीश कुमार जर भाजपाप्रणीत एनडीए सोडत असतील आणि तेजस्वी यादव यांना बिहारचा मुख्यमंत्री बनवत असतील, तर विरोधी पक्ष त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करेल. अशी ऑफर थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजदकडून देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूचे सात पैकी सहा आमदार भाजपामध्ये गेल्यामुळे, काहीशी नाराज झालेल्या जदयूला राजदचे नेते आणि माजी बिहार विधानसभा स्पीकर उदय नारायण चौधरी यांनी ही ऑफर दिली आहे.

bottom of page