top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींवर गुन्हा
पंढरपूर : पदवीधर,शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी पंढरपुरातील द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी थेट प्रवेश केला. या प्रकरणी पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून खासदार सिध्देश्वर महास्वामी यांनी मतदारांवर प्रभाव पाडला, यासह इतर कलमांतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल, तसेच निवडणूक आयोगाचे व्हिडीओ चित्रीकरण आणि मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
bottom of page