top of page

दिल्लीतील स्फोटामागे जैश उल हिंद; संघटनेनं घेतली जबाबदारी

दिल्लीतील इस्रायली दूतावास परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी जैश उल हिंद या संघटनेनं घेतली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना संशयित चॅनेलची टेलिग्रामवर एक चॅट मिळाली आहे. ज्यात जैश उल हिंदने दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चॅटमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, यंत्रणांकडून जैश उल हिंदकडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. या आधी घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते.

bottom of page