top of page

IPL 2021: खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर

फेब्रुवारी महिन्यात IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव होणार असून अखेर आज IPL गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीखदेखील जाहीर केली. 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा IPLने अधिकृत ट्विटर हँडलवरून केली. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

bottom of page