top of page

भारताचा सलग दुसरा पराभव; मालिकाही गमावली

ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ३९० धावांचा पाठलाग करताना भारताला ९ बाद ३३८ इतक्या धावा करता आल्या. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत १०४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. विराट कोहलीने ८९ धावांची खेळी केली तर लोकेश राहुलने ७६ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

bottom of page