top of page

कोरोना लसींच्या आढाव्यासाठी ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आज भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : जगभरातील ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी भारतातील आघाडीच्या बायोटेक कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचा आढावा घेणार आहेत. पहिल्यांदा ते हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर इतर शहरांमधील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देणार आहेत. कोरोना प्रतिबंधासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारताने सातत्याने आपला सहभाग नोंदवला आहे.

bottom of page