top of page

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज ३ ते ४ तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. त्यानंतर हीच स्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

bottom of page