top of page

सीबीएसईपाठोपाठ ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता सीबीएसईपाठोपाठ आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती "आयसीएसई"नी दिली आहे.

bottom of page