top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
राज्यभर उष्णतेची लाट
यंदा मार्च महिन्यापासून उन्हाळा जाणवण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट मागील दोन दिवसापासून तीव्र होत आहे. राज्यात सध्या कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. राजस्थानात निर्माण झालेले उष्ण वारे पूर्वेकडून महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने मुंबईसह राज्यभरात काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. ही उष्णतेची लाट रविवारपासून ओसरेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव आणि सोलापूरमध्ये ४० अंशांपुढे, तर पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर आणि वर्धा येथे ३९ अंश होते.
bottom of page