top of page

५० वर्षांवरील नागरिकांना मार्चपासून लस - डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता असून या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि इतर व्याधीग्रस्त व्यक्तींना लास देण्यात येणार आहे,' अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी लोकसभेत दिली. 'या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल,' असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

आतापर्यंत देशात ५० लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात करोना योद्धे मिळून तीन कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. तिसऱ्या टप्प्याला मार्चमध्ये कोणत्याही आठवड्यात सुरुवात करता येईल. त्याची नेमकी तारीख तूर्त सांगता येणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

bottom of page