top of page

हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान हवं असेल तर...

हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान हवं असेल तर त्याला सातत्यानं गोलंदाजीही करण्याची करण्याची गरज असल्याचं विराट कोहली याने सांगितले. पांड्यानं एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती. दरम्यान, आगामी कसोटी सामन्यांमध्ये पांड्याला फलंदाज म्हणून उतरवलं जाईल का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला त्यावेळी त्यानं थेट नकार दिला. आम्हाला त्याच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे, आमची याबाबत चर्चाही झाली आहे. परदेशातील परिस्थितीमध्ये त्याचा खेळ संतुलित असतो. त्यावेळी त्याची गोलंदाजीही संतुलित असते, असं विराट म्हणला.

bottom of page