top of page

ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : ग्रामपंचायतीची निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरताना एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परशुराम शिगवण हे गाव पॅनल वॉर्ड क्रमांक २ मधून उमेदवार होते. निवडणुकांचा प्रचार सुरु असताना शिगवण यांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान परशुराम शिगवण यांना प्राण गमवावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

bottom of page