top of page

फ्लिपकार्ट आता मराठीत

ई कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे. दोन महिन्यापूर्वी मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने आश्वासन दिलं होतं. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते.

bottom of page