top of page

विद्यार्थ्याने बनविले शिक्षिकेचे बनावट फेसबुक अकाऊंट ...

इंग्रजी माध्यमाच्या अकरावीतील एका मुलाने शिक्षिकेचे बनावट सोशल मीडिया अकाऊंट उघडून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात ही धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर या मुलाने शिक्षिकेला शरीरविक्रय करणारी महिला असल्याचे दाखवलं. तिच्या फोटोग्राफमध्ये बदल करुन, सोबत तिचा मोबाइल नंबरही अपलोड केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या चुलत भावाला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं आहे. महिन्याभरापासून हा मुलगा शिक्षिकेच्या घरी गणिताच्या शिकवणीसाठी जात होता. पण या मुलाच्या विचित्र वागण्यामुळे नंतर त्याची शिकवणी बंद केली. व्हॉट्स अ‍ॅपवरील डीपीच्या फोटोमध्ये बदल करुन, तो फेसबुक आयडीसाठी वापरण्यात आला होता. एका रात्रीसाठी १५०० रुपये आकारले जातात असा मेसेज तिच्या बनावट फेसबुक अकाऊंटवर लिहिला होता, जेव्हा या महिलेला मोठया प्रमाणात कॉल येऊ लागले, तेव्हा तिने पोलिसात धाव घेतली व तक्रार नोंदवली.

bottom of page