top of page

FAU-G गेम : 24 तासांत 10 लाखांच्या वर डाउनलोड

‘मेड इन इंडिया गेम’ FAU-G प्रजासत्ताक दिनी भारतात लाँच झाला. लाँचिंगपूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्टर केलं होतं. त्यानंतर आता प्ले-स्टोअरवरील आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केल्याचं समोर आलं आहे. 460 MB साइज असलेल्या या गेमला युजर्सकडून प्ले-स्टोअरवर 4.7 रेटिंग मिळाली आहे. प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असला तरी आयफोन युजर्सना FAU-G खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे.

bottom of page