top of page

देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’

देशात कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी पंजाबा, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आला होता. त्याचे परिणाम समोर आल्यानंतर, लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ पार पडणार आहे. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक करणार आहेत.

bottom of page