top of page

बायकोसाठी हिरे कारागिर बनला बाईकचोर

आपल्या मोठ्या बहिणीच्या ऐशोआरामाच्या लाईफस्टाईला भुलून पतीला जास्त पैसे कमाव असा तगादा लावत होती. बायकोच्या इच्छा आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगता यावं यासाठी सूरतमधील एका हिरे कारागिराने चक्क मोटारसायकल चोरण्यास सुरुवात केल्याचं उघड झालंय. सूरत क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या बाईक चोराला अटक केली असून बलवंत चौहान असं त्याचं नाव आहे. कापोदरा, वरचा, अमरोली, कातरगाम या भागांत बलवंतने किमान ३० बाईक चोरल्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

bottom of page