top of page

स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार – धनंजय मुंडे

पुणे : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी केली.

bottom of page