top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
करोडपती उद्योजकाच्या मुलाने फक्त ३० हजारांसाठी केला खून
करोडपती उद्योजकाच्या मुलाने फक्त ३० हजारांसाठी ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवनहहळ्ळी (जि. बेंगलुरु) येथे ही घटना घडली. आरोपीचं नाव राकेश असून त्याने बॅटने मूर्ती यांना मारहाण केल्यानंतर मानेवर वार करत हत्या केली. राकेशने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरत पळ काढला. मूर्ती घरी न परतल्याने मूर्ती यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी राकेशची चौकशी केली असता त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे सर्व त्याने फक्त त्याच्यावर असणाऱ्या ३० हजार रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राकेश श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्या वडिलांची सात कोटींची संपत्ती आहे.
bottom of page