top of page

दिल्लीच्या चारही सीमांवर धडकणार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

गेल्या दीड महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचालनादरम्यान शेतकरी ट्रॅक्टर संचलनही करणार आहेत, त्याचीच ही रंगीत तालीम असल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारसोबत कृषी संघटनांच्या नेत्यांची सात वेळा चर्चा झाली मात्र यावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र करत आज राजधानीच्या चारही सीमांवर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत.

bottom of page