top of page

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लवकरच अतिरिक्त ३०० आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली पालिकेच्या अखत्यारीतील काही रुग्णालये कोविड रुग्णालयांत रूपांतरित करण्यात येणार असून मनुष्यबळाच्या अभावामुळे डॉक्टर आणि निमवैद्यकीय दले तैनात केली जाणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने शहा यांनी रविवारी एका बैठकीत राजधानीतील स्थितीचा आढावा घेतला.

bottom of page