top of page

चेन स्नॅचर निघाला सॉफ्टवेअर इंजिनीअर

कर्नाटक पोलिसांनी एका चेन स्नॅचरला अटक केली आहे. विशेष म्हणजे चेन स्नॅचर हा मूळचा तामिळनाडूतील. तो अभियांत्रिकी पदवीधर असून २०१२ पर्यंत एका आयटी कंपनीत तो टीम मॅनेजर होता. पण व्यसनासाठी त्याने नोकरी सोडून हा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासाअंती निष्पन्न झाले. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांत मिळून या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बंगळुरुत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातली साखळी चोरुन जाताना झालेल्या अपघातात हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. जयकुमार असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळून ३.७ लाख किमतीच्या सोन्याच्या चेन आणि १५ मोबाईल सिमकार्ड जप्त केली आहेत. २०१९ पासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेरीस वर्षभर तपासाअंती पोलिसांनी जयकुमारला अटक करण्यात यश मिळवलं आहे.

bottom of page