top of page

पुनर्विवाहाला नकार; विधवा महिलेचं नाक आणि जीभ कापली

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका २८ वर्षीय विधवा महिलेने नातेवाईकासोबत पुनर्विवाहाला नकार दिल्याने सासरकडच्या मंडळींनी तिचं नाक आणि जीभ कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जोधपूर येथील रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून सहआरोपींचा शोध सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. लग्नानंतर वर्षभरातच सदर महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सासरकडच्या मंडळींनी तिचे एका नातेवाईकासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते.

bottom of page