top of page

... तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील : चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारकडून फारशी अपेक्षा नाही पण राज्य सरकार जर आता जागी झाली नाही तर महिलासुद्धा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतः कायदा हातात घेतील व आता ही वेळ दूर नाही. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला. त्यांनी ट्विट करत या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली.

bottom of page