top of page

कोरोना लस घेतल्यानंतर ४८ तासांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर ४८ तासांमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पोर्तुगीजमध्ये घडली. मृत्यू झालेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव सोनिया असेवेडो असं होतं. लस घेतल्यानंतर सोनिया यांना कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नव्हते. मात्र लस घेतल्यानंतर दोन दिवसांमध्येच सोनिया यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतरच सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. ब्रिटननंतर फिनलॅण्ड आणि बुल्गेरियामध्येही अमेरिकन कंपनी असणाऱ्या फायजरची लस दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.

bottom of page