top of page

राज्यात गेल्या चोवीस तासांत साडेपाच हजार नवे रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख खाली आला असला तरी पुन्हा एकदा आता त्यात वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

bottom of page