top of page

देशात एका दिवसात ४१ हजार कोरोनाचे नवे रुग्ण

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३२२ नवीन रुग्ण आढळले असून ४८५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं शनिवारी आकडेवारी जाहीर करताना दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९३ लाख ५१ हजार ११० वर पोहचलीय. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९३.६७ टक्क्यांवर पोहचलाय.

bottom of page