top of page

कोरोना लसीकरण : १०० टक्के हमी नाही, मास्क आवश्यकच

देशभरात कोरोना लसीकरणास लवकरच सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लसीकरण १०० टक्के सुरक्षेची हमी देत नाही. मास्कचा वापर करणं आवश्यकच आहे. याशिवाय सुरक्षित अंतर ठेवणं व करोना संसर्गास आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला असं आपल्याला आता म्हणता येणार नाही.

bottom of page