top of page

सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.

bottom of page