top of page

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार

कोरोनाच्या काळातील विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध कमी करत यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता हे अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी दिली. त्याचबरोबर नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.

bottom of page