top of page

सिगारेट ओढ नाहीतर...

⬛ रुममेटच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या ⬛


पुणे : सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी रुममेटने दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही घटना समोर आली आहे. सागर पवार असं आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलिसानी लक्ष्मण पाटील (वय ३०, गुरुदत्त कॉलनी) याला पोलिसानी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सागर पवारने बारावीचे वर्ष नुकतेच पूर्ण केले होते. तो अनाथ असल्याने आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर एका खासगी कंपनीत सागर कामालाही लागला होता. तीन दिवसांपूर्वी तो गुरुदत्त कॉलनी कर्वेनगर पुणे येथील बॉईज हॉस्टेलमध्ये राहण्यास आला होता. लक्ष्मण पाटील हा त्याचा रुममेट होता. लक्ष्मणने सागरला पहिल्या दिवसापासून सागरला सिगारेट ओढण्याची सक्ती करत त्याच्या मागे तगादा लावत होता. सागरने लक्ष्मणला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. मात्र लक्ष्मण ऐकतच नव्हता तू सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार करेन अशी धमकीही लक्ष्मणने सागरला दिली. त्याच्या सततच्या सिगारेट ओढण्याच्या आग्रहाला कंटाळून सागरने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

bottom of page