top of page

चीनने दिला अमेरिकेला झटका

चीनला आर्थिक झळ पोहोचवण्याचाही ट्रम्प प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र,डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार सोडताच चीनने ट्रम्प यांच्या टीममधील २८ सदस्यांना धक्का देत चीनमध्ये तसेच हाँगकाँग आणि मकाऊ येथे त्यांच्यावर बंदी घातली. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत काही चीनविरोधी स्वार्थी नेत्यांनी आपल्या राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी चीनविरोधात पूर्वग्रह दूषित करून अमेरिका आणि चीनमधील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं. अमेरिकेच्या नेत्यांनी चीनच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्यासाठी मुद्दाम पावले उचलली होती. चीन सरकार देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितांचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असं सांगत चीनने २८ जणांवर बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही चीननं दरवाजे बंद केले आहेत. त्या २८ जणांना चीनसोबत व्यापार करण्यावरही बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

bottom of page