top of page

शेतकरी आंदोलन : ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचेही संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले आहे. तसेच, दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

bottom of page