top of page

सीबीआयची टीम एनआयएच्या कार्यालयात दाखल ; तपासाला वेग

मुंबई मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मार्ग मोकळा झालेल्या सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे. उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली असून आज सकाळी सीबीआयचे अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल झाले होते. सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.

bottom of page