top of page

काँग्रेस नेत्याच्या मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

भष्ट्राचाराच्या आरोपांशी संबंधीत एका प्रकरणात सीबीआयने आज काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरांवर छापे टाकले. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील १४ पेक्षा जास्त मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. भाजपा नेहमीच सूडाचं राजकारण करते आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. डीके शिवकुमार यांच्या घरांवर सीबीआयकडून करण्यात आलेली छापेमारी पोटनिवडणुकीसाठी आम्ही केलेली तयारी निष्प्रभ ठरवण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

bottom of page