top of page

३० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस

कोरोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्र संथ झालं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, तात्काळ बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

bottom of page