top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 1 November 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
शेतकरी आंदोलन : भाजपाने दिली ‘तिरंगा रॅली’ची हाक
दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरुन आणि लाल किल्ल्यामध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरुन दिल्लीमध्ये तिरंगा फडवण्याची घोषणा केली असून यासाठी विशेष झेंडा रॅली काढण्याची घोषणा केली आहे. “तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान. तिरंगा मार्च ३० जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून हा मोर्चा सुरु होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या मोर्चामध्ये नक्की सहभागी व्हा,” असं शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
bottom of page