top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Saturday, 31 October 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
ज्येष्ठ नेत्याची भाजपाला सोडचिठ्ठी
नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुनच आपलं मत हे पक्षाच्या मतापेक्षा वेगळं असल्यानेच आपण पक्ष सोडल्याची माहिती हरयाणातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव रामपाल माजरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. हा कायदा केवळ शेतकरीविरोधी नसून तो अंमलात आणल्यास त्याचा समाजातील इतर घटकांवरही प्रतिकूल परिणाम होईल. तीनदा आमदार राहिलेल्या माजरा यांनी इंडियन नॅशनल लोकदलला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माजरा यांनी नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं होतं.
bottom of page