top of page

आणखी एका भाजप नेत्यानं केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या शिवसेनेनं भाजपला सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका दिला आहे. शुक्रवारी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी भाजपचे आणखी एक माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमेंद्र मेहता यांच्या हातावर शिवबंधन बांधले व त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. मेहता यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. दरम्यान, गुजराती मतदारांना आकर्षित करण्याच्या मोहिमेत मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता असल्यामुळेच शिवसेनेनं त्यांना प्रवेश दिल्याचं बोललं जात आहे.

bottom of page