top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी
नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात दोन लसींना मंजुरी मिळाल्याने सर्वांना दिलासा मिळत असतानाच आता बर्ड फ्लूचे नवे संकट उभे राहिले आहे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील प्रशासनाने पुढील १५ दिवसांसाठी कोंबड्या तसेच अंडी विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यस्तरीय आपत्ती म्हणून औपचारिक घोषणा करत कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. कर्नाटकमधील बंगळुरुमध्येही कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.
bottom of page