top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
भारत बायोटेकच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू
नवी दिल्लीः भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे. भारत बायोटेक जगातील एकमेव लस बनवणारी कंपनी आहे, जिच्याकडे बायोसॅफ्टी लेव्हल -३ उत्पादन सुविधा आहे. २६ हजार स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होणार आहे, असं गेल्या महिन्यात कंपनीने म्हटलं होतं. लशीच्या तिसर्या टप्प्याच्या चाचणीसाठी कंपनीने २ ऑक्टोबरला भारतीय औषध नियंत्रककडून परवानगी मागितली होती. त्याचबरोबर करोना संसर्ग कमी करण्यासाठी कंपनी आणखी एका लशीवर काम करत आहे. ही लस नाकातून ड्रॉपच्या रूपात दिली जाईल. ही लस पुढील वर्षापर्यंत तयार होईल.
bottom of page