top of page

१५ वर्ष जुन्या रिक्षांना रस्त्यावर बंदी

मुंबई : राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन विभागानं घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई एमएमआर परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीदरम्यान या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

bottom of page