top of page

आशिष शेलार यांच्याकडे नवी जबाबदारी

मुंबईः भाजप नेते आशिष शेलार यांना पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली असून हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भाजपनं राज्य प्रभारींची नव्या टीमची यादी जाहीर केलीय.त्यानंतर आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी राष्ट्रीय यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर, कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

bottom of page