top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित
नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे शनिवारपासून (३० जाने.) आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे गेले आठवडाभर प्रयत्न सुरू होते. आज राळेगणसिद्धीत केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपला यश मिळाले असून अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर आपण समाधानी असल्याचेही यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितले.
bottom of page