top of page

'तिनं' शेजाऱ्याला चपलेनं मारलं आणि तिसऱ्याच दिवशी ...

घरकाम करणाऱ्या ३० वर्षीय महिलेला भररस्त्यात चाकूने भोसकून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बेंगळुरूजवळ ब्रुकफील्ड परिसरात रविवारी सकाळी ही असून अलीम बिबी असे मृत महिलेचे नाव आहे.

मूळची पश्चिम बंगालची असणारी अलीम बिबी हिला तीन मुले असून ती आपल्या पतीसोबत कुंडलाहल्ली येथे राहत होती. बीबीने शेजारी राहणाऱ्या रफिक उल शेखकडून १० हजार रुपये उसने घेतले होते आणि ते तिने हप्त्या-हप्त्यांत परत केले होते. पण अलीकडेच शेख याने तिच्याकडे पुन्हा सगळे पैसे परत दे अशी मागणी केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी बिबीने त्याला चपलेने मारहाण केली.

दरम्यान, कामावर जात असताना चाकूने भोसकून तिची हत्या केली. शेख याने घटनेनंतर फोन तिथेच टाकला आणि पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चप्पलने मारल्याचा राग मनात धरून शेख याने सूड उगवला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

bottom of page